आजोबा आणि नातवाच्या वादावर रोहित पवार म्हणाले…

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वरर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारल्यामुळे पार्थ पवार मोठा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच या प्रकरणावर शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार यांचा विषय हा कौटुंबिक आहे. त्यासंदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केलं आहे. कौटुंबिक विषयावर राजकारण होत आहे, असं रोहित पवांरांनी म्हटलं आहे. पवांरानी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.  यावेळी बोलताना त्यांनी सुशांत सिंहच्या प्रकरणावरून भाजपवर त्यांनी निशाणा साधला.

सध्या महाराष्ट्रातील भाजपच्या खूप मोठ्या नेत्याला बिहार निवडणुकीसाठी भाजप प्रभारी म्हणून सुत्र हातात दिली जाणार असल्याची बातमी समजली. यावरून एक लक्षात आलं की भाजप सुशांत सिंहच्या प्रकरणाचा इतका आवाज का उठवत आहे, हे स्पष्ट होऊ लागलं आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांच सिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणात राजकारण होत आहे हे मी आधीच बोलत होतो मात्र ते आता प्रत्यक्ष दिसू लागलं असल्याचं म्हणत पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! माहेरी रहात असलेल्या विवाहित भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार अन् मग…

ऐकावं ते नवलच! मौसम देवी या महिलेनं दिला चार बाळांना जन्म

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं लवकरच शुभमंगल सावधान; ‘या’ व्यक्तिसोबत अडकणार विवाह बंधनात!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात, ट्विट करत दिली माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या स्वातंत्रदिनाची खास तयारी, जाणून घ्या!