“चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही”

मुंबई | ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे परिणाम इतर राज्यांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावर चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला. मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, जय महाराष्ट्र, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला त्यांच्या पक्षात नेते संभाळता येत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडं यावं. तसं झालं तर मजबूत सरकार राज्यात अस्तित्वात येईल, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं.

दरम्यान, मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का??? काका जरा जपून…, असं टविट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

जे करायला नको तेच केलं; महाराजावर गुन्हा दाखल

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सुट्टी नाहीच!

-#CoronaVirus I ‘त्या’ 11 जणांना बाहेर न पडण्याच्या सूचना

-#Corona | स्वत:च डोकं वापरुन औषध घेऊ नका; अजित पवारांचं आवाहन

-#Corona I परदेशातून आलेल्या कुटुंबाला स्वत:च्याच घरात जाण्यापासून रोखलं अन् पुढे…