Top news महाराष्ट्र मुंबई

शिवसेना राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार; भूमिपूजनानंतर संजय राऊत गरजले

मुंबई | अयोध्येमध्ये आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. राम मंदिर भूमीपूजनानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आनंद व्यक्त करत आपलं मत स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही राम जन्मभूमीत जावून थाटामाटात कार्यक्रम करतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

“राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आजचा मुहूर्त महत्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये कारण हा शासकीय कार्यक्रम आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्याबरोबरच, आजच्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेना आयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे. बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांला कोणीही विसरू शकत नाही. राम मंदिर उभारणीत त्यांचं मोठं योगदान आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ज्यांच्या रक्तात शिवसेना आणि ज्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी होता, तो अखेर काळाने निष्ठुरपणे थांबवला”

“500 वर्षांची प्रतीक्षा संपली, 135 कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे मोदी पहिले पंतप्रधान”

रामाचा वनवास अखेर संपला; ऐतिहासिक राम मंदिराचं भूमिपूजन संपन्न

“राम मंदिराला न्याय मिळवून देणारे गोगाई अन् बाबरीची घुमटे पायापासून उध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

पंतप्रधान मोदींचं प्रभू श्रीरामांना साष्टांग दंडवत; भूमिपूजन स्थळी दाखल