पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी | गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस चालू आहे. दोन दिवस सतत चालू असणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बावनदी, काजळी, तोनदे, सोमेश्वर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला पूर आल्यामुळे सोमेश्वर, चांदेराई, हरचेरी, चिंचखेरी या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा पाली दरम्यानचा अंजणारी पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे.

अंजणारी पूल बंद असल्याने मुंबई वरून येणाऱ्या चाकरमन्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईहून गावी निघालेल्या चाकरमन्यांना पावसमुळे वाटेत अनेक थांबे घ्यावे लागले आहेत. 24 तास उलटून गेले तरी ते आपल्या गावी अजून पोहचू शकले नाहीत.

वाटेत काहीच मिळत नसल्याने चाकरमन्यांचे अन्न आणि पाण्याविना हाल होऊ लागले आहेत. पाऊस जीवावर उठलेला असतानादेखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी चाकरमन्यांकडे दुःर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…

भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!

अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी

सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण