पत्नीला रोगानं ग्रासलं, नातेवाईकांनी त्याला नाकारलं; तो मात्र एकटाच जळत राहिला!

नवी दिल्ली | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. या महामारीविषयी लोकांच्या मनात दहशत तयार झाली आहे. अनेक ठिकाणी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारच्या कटिहारमध्ये आता नातेवाईकांनीच मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कटिहारमध्ये एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. या दाम्पत्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार चालु होते. उपचारादम्यान पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

मृतदेहाला कोणीच ताब्यात घेत नसल्याने 24 तास हा मृतदेह रुग्णवाहिकेतच पडून होता. शेवटी प्रशासनानं यासाठी पुढाकार घेतला. प्रशासनानं हा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15,83,792 वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात तब्बल 34,968 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 52,123 नवीन रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या  बातम्या-

‘होय मी अनेकांचे खून केले, कित्येकांच्या किडण्याही काढल्या’; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

माझं वाक्य उलटं वाचलं गेलं, मी म्हटलं होतं की…- चंद्रकांत पाटील

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याहसह…; मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्या अगोदरच कोरोनाचे विघ्न!

नरेंद्र मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींची मोदींवर जोरदार टीका

विधान परिषद मागायला भाजप नेत्यांच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांनी पाटलांवर आक्षेप घेऊ नये- राम कदम