पुणे | आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं विकसित केलेल्या पुणे स्मार्ट सिटी वाॅर रूमला (डॅश बोर्ड) उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेला कोरोनासंबंधित उपाययोजना करताना येणाऱ्या अडचणी तसंच विविध समस्या जाणून घेतल्या.
याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणालीची कार्यपद्धती जाणून घेऊन त्यांनी काही उपयुक्त सूचना केल्या. ही प्रणाली उत्तम असून शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र, रुग्ण, वाढत्या परिसराची अद्ययावत माहिती इथं उपलब्ध होते. त्यामुळे उपाययोजना करणं सोपं जातं. अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी आपण पाहू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी पुणे स्मार्ट सिटी वाॅर रूमला भेट दिल्यानंतर दिली.
भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे अन्य जागी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी डॉक्टर, रुग्णवाहिका संख्या व त्यांच्या उपलब्धतेबाबत त्यांनी आढावा घेतला. यासोबतच निधीची आवश्यकता भासल्यास तशी मागणी करा. तत्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
दुसरीकडे पुण्याचा कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. दररोज 150 च्या आसपास कोरोना रूग्णांची वाढ होत असताना अॅक्टीव्ह पेशंटची संख्या आता कमी होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर
-खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
-“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”
-मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु
-कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील