1 एप्रिल ठरवणार ‘ठाकरे सरकारचं भविष्य’; प्रकाश आंबेडकरांची भविष्यवाणी

मुंबई | कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास संस्थेकडे( NIA) देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. मात्र सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतचा तपास एनआयकडे देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांनीदेखील भीमा कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्यावर नाराजी दर्शवली आहे.

1 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी NRP लागू होणार आहे. याप्रकरणीसुद्धा राज्य सरकारने आणखी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अंमलबजावणी करण्यास तिन्ही पक्षांची परवानगी असेल तरच सरकार टिकतं. काही पक्ष म्हणाले अंमलबजावणी करा… काही म्हणाले नाही करायचं… तर अशा परिस्थितीत सरकार टिकणं मुश्किल आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकारमध्ये जे पक्ष बसलेत त्यांचे विचार आणि मतदार वेगळे आहेत. अगोदर एक निर्णय घेतला जातो नंतर गृहमंत्री वेगळा निर्णय घेतात. मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरून भीमा कोरेगावचा तपास एनआयकडे दिला. यावरून राज्य सरकारमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतोय असं दिसतंय त्यामुळे संशयाला जागा आहे, असं आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, विविध प्रकरणांत शासनात एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात तिन्ही पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल, असं आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सचिनने व्हॅलेंटाईनदिनी जागवली पहिल्या प्रेमाची आठवण!

-दानशूर भिकारी….. मंदिराला दिले 8 लाख रूपये!

-‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्लॅन काय विचारताच आदित्य ठाकरे लाजले; म्हणाले…

-औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार; चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

-इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी