“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”

लखनऊ | आध्र प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू सध्ये चर्चेत आलेत. त्यांनी आध्र प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यास 50 रूपयांमध्ये दारू दिली जाईल, असं आश्वासन लोकांना दिलं आहे.

सध्या दर्जेदार दारुच्या बाटलीची किंमत 180-200 रुपयांपेक्षा जास्त आहे. मंगळवारी विजयवाडा येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, वीरराजू यांनी निकृष्ट दर्जाची दारू चढ्या किमतीत विकल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली.

राज्यात सर्वच बनावट ब्रँड्स चढ्या किमतीत विकले जातात, तर लोकप्रिय आणि लोकप्रिय ब्रँड्स उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

महिन्याला राज्यातील दारू पिणारी व्यक्ती 12 हजार रूपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी लोक दारूचे सेवन करतात. या एक कोटी लोकांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपला मतदान करावं, असं सोमू वीरराजू यांनी म्हटलं आहे.

लोकांनी 2024 च्या निवडणुकीत भाजपला मतदान करावं. आमची सत्ता आल्यास दर्जेदा रदारू 75 रुपये प्रति बाटली दराने देऊ. जर राज्याचा महसूल वाढला, तर ही किंमत 50 रुपये प्रति बाटली करू, असं आश्वासन वीरराजू यांनी लोकांना दिलं आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारुचे कारखाने आहेत. ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात. भाजपची सत्ता आल्यास राज्यातील जनतेला मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य योजना देण्याचं आश्वासनही सोमू वीरराजू यांनी दिलं. राज्यात दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचं आश्वासन देत शेतीला पर्यायही आणणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, एकीकडे बिहारमध्ये भाजप-राजदचे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारु बंदीची घोषणा केली आहे. त्यांचा हा निर्णय चर्चेत आहे, पण दुसरीकडे भाजप नेत्याच्या विधानामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील” 

काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य 

कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर 

टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय