‘या’ स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाख रुपयांचे झाले ‘इतके’ लाख

मुंबई | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. 25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी आहे.

या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात. मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. मात्र अनेक पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

3i Infotech हा देखील असाच एक शेअर आहे. या पेनी शेअरने गेल्या 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा दिलाय.  शेअरच्या किमतीचा इतिहास तपासला तर तुम्हाला कळेल की, गेल्या 5 दिवसात ट्रेडिंगदरम्यान 5 अप्पर सर्किट्स दिलेत.

गेल्या 5 दिवसांत त्यात 21.50 टक्क्यांनी वाढ झाली. जर आपणास एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर पेनी शेअर 35.85 रुपयांवरून 108.50 रुपयांपर्यंत वाढला. तसेच त्याने सुमारे 200% फायदा दिला आहे.

आपण मागील 3 महिन्यांबद्दल विचार केला तर हा 8.48 रुपये प्रति शेअर होता. 27 ऑगस्ट 2021 ला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 3i इन्फोटेकची किंमत ₹ 9 देखील नव्हती.

26 नोव्हेंबरला जेव्हा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली, तेव्हाही या शेअरने आपला कल बदलला नाही. हा शेअर आता 108.50 रुपयांवर व्यवहार करत आहे. टक्केवारीत मोजायचे झाल्यास तो 1200 % फायदा देतो.

3i इन्फोटेकने आपल्या गुंतवणूकदारांना अनेक पटीने परतावा दिला. जर तुम्ही 1 आठवड्यापूर्वी त्यात ₹ 1 लाख ठेवले असते, तर ते आता ₹ 1.21 लाख झालं असतं. त्याचप्रमाणे जर एखाद्याने महिन्याला 1 लाख रुपये मागे ठेवलं असते तर त्याने आतापर्यंत ₹ 3 लाखांमध्ये रूपांतरित केलं असतं.

जर आपण 3 महिन्यांच्या गुंतवणुकीबद्दल बोललो तर 3 महिन्यांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख ठेवले असतील तर त्याचे आतापर्यंत 13 लाख रुपये झालेत.

दरम्यान, पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची मानली जाते. मात्र असे काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत अनेक पटींने पैसे कमावून दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले… 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू 

खळबळजनक बातमी समोर; एकाच कॉलेजमधील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची राज्यात दहशत; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय 

कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा!