आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई करत एनसीबीने ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील ही कॉर्डेलिया क्रुझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून कॉर्डेलिया क्रुझची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता 2 हजार प्रवासी कॉर्डेलिया क्रुझवर अडकल्याने या क्रुझची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

कॉर्डेलिया क्रुझमधून 2 हजार प्रवासी गोव्यासाठी निघाले होते. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कॉर्डेलिया क्रुझवर गेलेले हे 2 हजार प्रवासी क्रुझवरच अडकले आहेत.

क्रुझवरील सर्व प्रवासी व स्टाफ मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या जहाजातील क्रू स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्टाफला कोरोना झाल्याचं समजताच एकच खळबळ उडाली.

कोरोनाबाधित क्रु मेंबर्सना तातडीनं वेगळ करण्यात आलं आहे. जोपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत कोणालाही क्रुझमधून उतरण्याची परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टने ही क्रुझ गोव्यात उभी करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे क्रुझ सध्या मुरगाव पोर्ट टर्मिनलजवळ थांबवण्यात आली आहे.

अँटीजेन चाचणीच्या अहवालात क्रु मेंबर कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत फक्त एका क्रु स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. सध्या इतर लोकांच्या कोरोना अहवालाची प्रतिक्षा आहे.

राज्यात आधीच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात क्रुझवरील प्रवाशांचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसतं, जे घडतं ते रक्तरंजित असतं”

CDS जनरल बीपीन रावत यांच्या अपघाताबद्दल ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

कोरोनाची ‘ही’ दोन नवीन लक्षणं आली समोर; दिसताच लगेच टेस्ट करुन घ्या!

मेहबूबाला पाठीवर घेऊन चालला होता तरूण अन् पुढे भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

“वाजपेयींची गाडी मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे वापरली, मोदीजींनी 7 वर्षांत 4 गाड्या बदलल्या”