राज ठाकरेंच्या सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

पुणे  | मनसेच्या पुण्याल्या सभेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्श केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

राज ठाकरेंचा भाषणातील महत्वाचे मु्द्दे- 

आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा?

मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.

मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही

मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार

उत्तर प्रदेशात एक खासदार उठतो आणि विरोध करतो, हा सगळा डाव होता. माझ्यावर टीका होत असेल तर टीका सहन करायला तयार आहे. माझी पोरं अडकू देणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

गेल्या १४ आणि १५ वर्षांनी जाग आली. राज ठाकरेंनी माफी मागितली तरचं अयोध्येत पाय ठेवू यातून चुकीचे पायंडे पडतात हे सगळ्यांनी लक्षात ठेवाव, असं राज ठाकरे म्हणाले.

काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं

जर मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा जोरात लावा, असं मी सांगितलं. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार असं सांगितलं, त्यानंतर त्यांना अटक झाली. मधू इथे आणि चंद्र तिथे, असं झालं. त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. शिवसैनिक आक्रमक झाले. लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य जेवतानाचे फोटो समोर आली. यांचं हिंदुत्त्व ढोंगी आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी टीका सहन करेन पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही” 

“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….” 

राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…