आभाळाएवढा बाप गेल्याचं दु:ख निबंधातून मांडणाऱ्या मुलाला मंत्री धनंजय मुंडे करणार मदत!

मुंबई |  आपलं आयुष्य सुखात जावं म्हणून खस्ता खाणारा बापच काळाने हिरावून नेला. त्याचं दु:ख पत्रातून मांडणाऱ्या 10 वर्षीय मुलाची दखल सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. संबंधित मुलाला सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

मंगेश परमेश्वर वाळके असं या निबंध लिहिणाऱ्या मुलाचं नाव आहे. तो सध्या इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत आहे. शाळेत शिक्षकांनी माझे बाबा हा निबंध लिहायला सांगितला. मंगशने बाबा गेल्याने आयुष्यात कसा अंधार झालाय याची अंदाज येणारी परिस्थिती निबंधातून मांडली. काही वेळातच हा निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मंगेशची आई अपंग आहे. त्यामुळे वडिलांच्या जाण्याचा त्याला प्रचंड मोठा धक्काच बसला आहे. त्याने आपल्या निबंधातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सामाजिक न्यायविकास मंत्री असलेल्या मुंडे यांनी दिव्यांग कल्याण निधीतून मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच सामाजिक न्याय विभागाकडूनही मदत देण्याचं जाहीर केलं आहे.

बीड जिल्हयातील वाळकेवाडीतल्या शाळेत तो चौथीमध्ये शिकत आहे. गेल्या महिन्यात मंगेशच्या वडिलांचं निधन झालं. मंगेशचं कुटूंब अजून पुर्णपणे या  धक्क्यातून सावरलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-शाहू महाराज आज जिवंत असते तर CAA आणि NRC कायदा टराटरा फाडला असता- हसन मुश्रीफ

-“भाजपच्या काळात बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास होत होता, आता विकासाची गाडी रूळावरून घसरलीये”

-मुख्यमंत्र्यांचं साई जन्मभूमीबाबतचं वक्तव्य खोटं; शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

-आम्ही एकमेकांची ‘मेहबूबा’ म्हणणाऱ्या दानवे खोतकरांची लढाई पुन्हा सुरू होणार!

-“गांधी कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान करायचे होते म्हणूनच देशाची फाळणी झाली”