महाराष्ट्र पुणे

मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प; राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन

Omicron

पुणे | मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यांसह जवळपास 10 शहरांचे व्यवहार आजपासून पुढील 10 दिवस ठप्प झाले आहेत. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालयांना टाळे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद, उल्हासनगर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले होते.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सर्व शहरांमध्ये लॉक डाऊनची स्थिती पाहायला मिळाली.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोनाच्या संदर्भात कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी मोदींना केली ही सूचना

-“…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा”

-जनता कर्फ्यु’च्या दिवशी सर्वच रेल्वे बंद राहणार का?

-महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर

-म्हणुन… अ‍ॅपलचे आयफोन्स एकापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाहीत