10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार

नवी दिल्ली | भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत गेटमनच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

याशिवाय, उमेदवार https://ner.indianrailways.gov.in/view या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://ner.indianrailways.gov.in/uploads/files/1641877685439-ESM%202022.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, 323 पदे भरली जातील. यापैकी 188 लखनौ केंद्रासाठी तर 135 इज्जतनगर केंद्रासाठी आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 11 जानेवारी आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा, उमेदवारांची वयोमर्यादा 65 वर्षे असावी. उमेदवारांना रु. 1800-25000 दिले जातील, अशी माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा 

‘एकदोन नाही तर दीड डझन मंत्री…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

‘या’ लोकांना Omicron चा सर्वात जास्त धोका ; WHO ने दिला गंभीर इशारा  

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”