Top news महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

Capture e1646830068452

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण जोरदार तापलं आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमध्ये काही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांना जोरदार निशाण्यावर घेतलं आहे. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना लक्ष केल्याचं पहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की, तळमळतंय, जळमळतंय. मात्र, आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दूर करता आली नाही, असंही लाड म्हणाले.

त्यांच्या पक्षातील खासदारांचं चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ, असं टोलाही लाड यांनी लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याचंही लाड यांनी स्वागत केलं. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर हिंदूूत्वाची प्रखर भूमिका मांडत राज्याच्या राजकारणाला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता राज्यात नवं वादळ आल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

  राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात” 

अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं