नागपुर | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाॅलिवूडमधील कलाकारांनाही सुशांतच्या जाण्यानं धक्का बसला आहे. मात्र नागपूरमध्ये चक्क १४ वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोरं आला आहे.
नयन मगनानी असं या १४ वर्षीय मुलाचं नाव असून तो सुशांतचा खुप मोठा चाहता होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर नयन गेली कित्येक दिवस तणावाखाली होता. अखेरीस राहत्या घरी फॅनला लटकून त्यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
नयनच्या वडिलांचा म्हणजेच इंद्रकुमार मगनानी यांचा शहरात बिल्डींग मटेरियलचा सर्वात मोठा व्यापार आहे. नयनला लहानपणापासूनच मोबाईलचं अफाट वेड होतं. मोबाईलवर गेम खेळणं हे त्याचं सर्वात आवडीचं काम होतं. यासाठी मला एखादा मोबाईल घेऊन द्या असा तगादाच त्यानं पालकांकडं लावला होता.
नयन शांत व्हावा यासाठी त्याची समजूत घालून वेळ मारून नेण्यात आली. मात्र नयननं रूममधील सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. नयनच्या या टोकाच्या पाऊलामुळं परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.
-ठाकरे सरकारचा मोठं पाऊल, पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय गृहमंत्र्यांनी केला जाहीर