शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी येणार PM किसान योजनेचा 16 हप्ता

PM Kisan Yojana l शेतकरी आंदोलनादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे. पीएम किसान वेबसाइटनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता केंद्र सरकार महिन्याच्या अखेरीस जारी करणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट गरीब शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे आहे. या धोरणाद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत मिळत असते. शेतकऱ्यांना वर्षभरात 2000 रुपयांचे तीन हप्ते मिळतात. PM किसान योजनेची रक्कम केंद्र सरकारद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

PM Kisan Yojana l पीएम किसानसाठी कोण पात्र आहे? :

पीएम किसान सन्मान निधी योजना ज्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष लागवडी योग्य जमीन आहे त्यांनाच उपलब्ध आहे. यापूर्वी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती.

पीएम किसान 16 वा हप्ता कधी येणार? :

पीएम किसान अंतर्गत आर्थिक रक्कम 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला जाणार आहे. या तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाईल. मात्र PM किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे.

PM Kisan Yojana l पीएम किसान 16व्या हप्त्याची माहिती कशी तपासायची? :

– सर्वात प्रथम यायोजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.Gov.In ला भेट द्या.
– यानंतर तुमच्या स्क्रीनवर दाखवलेल्या स्टेटस लिंकवर क्लिक करा.
– आता तुम्हाला स्क्रीनवरील दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागेल, तुम्हाला तुमचा नंबर किंवा नोंदणी आयडी तपासायचा आहे.
– विचारलेल्या संबंधित आणि योग्य माहितींसह स्क्रीनवर दर्शविलेले कोड प्रविष्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला पीएम किसान 16व्या हप्त्याची माहिती मिळेल.

News Title : 16th installment of PM Kisan Yojana will come

महत्त्वाच्या बातम्या-

या तारखेपासून सुरू होणार खरमास; या कालावधीत लग्न समारंभ पूर्णतः बंद राहणार

मार्च महिन्यात बँकांना भरमसाठ सुट्या, एवढ्या दिवस बँका राहणार बंद!

आज महाविकास आघाडी पुण्यात लोकसभा निवडणुकीचे रणशिंगे फुंकणार

आजचे राशिभविष्य! सोने-चांदीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभ होईल

जरांगे आता हे सगळं थांबवा नाहीतर… सरकारच्या मंत्र्यांकडूनच थेट मनोज जरांगे पाटलांना नवं आवाहन