स्वप्न अधूरंच राहिलं, 18 वर्षीय टॉप टेबल टेनिसपटूचा अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | भारतासाठी खेळायला मिळणं ही प्रत्येक खेळाडूसाठी आयुष्यातली मोठी संधी असते. तमिळनाडूच्या टॉप टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वाचं हे स्वप्न पूर्ण होत असतानाच विपरीत घडलं.

स्पर्धेला जात असताना दीनदयालचा अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबीय आणि मित्रांवर शोककळा पसरली. नव्या युवा खेळाडूला गमवल्याची भावना क्रीडा विश्वात आहे.

दीनदयालन विश्वा तमीजगा टेबल टेनिस असोसिएशन (TTTA) राज्य पुरुष टीमचा खेळाडू होता. शिलाँग इथे 83 व्या सीनियर राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या स्पर्धेसाठी दीनदयालन विश्वाची निवड झाली. तो तमिळनाडूहून मेघालयात शिलाँगला जाण्यासाठी निघाला.

विमानतळावर सुखरुप उतरला पण शिलाँगला स्पर्धेसाठी पोहोचण्याआधीच काळानं घात केला. ट्रकने विश्वाच्या कारला जोरदार धडक दिली.

वेगानं येणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि धडक देऊन तो 50 मीटर दरीत कोसळला. या दुर्घटनेत विश्वा गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

हत्त्वाच्या बातम्या- 

मृत्यू होत असताना माणूस काय विचार करतो?; संशोधनातून मोठा खुलासा 

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ; लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

खळबळजनक! शिवसेना आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या 

‘कपड्यांचे रंग बदलले म्हणून…’; आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला 

Russia-Ukrain War: “व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात”