पहिली ते नववीच्या परिक्षा रद्द होणर? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…

मुंबई |  जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे, शाळा, कॉलेज सर्व काही कित्येक महिने बंद होतं. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती.

कोरोनामुळे लाखो लोकांचे ब.ळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना  वेगाने हातपाय पसरु लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं महाराष्ट्रात हळूहळू सर्व शाळा, कॉलेज चालू होऊ लागली होती.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक स्तरावर आवश्यकता भासल्यास  शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी काल एका वृत्त वाहिनीशी बोलताना पहिली ते नववीच्या परिक्षांबद्दल देखील महत्वाची माहिती दिली आहे.

पहिली ते नववीच्या परिक्षांविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हि संख्या जर वाढत राहिली तर पहिली ते नववी पर्यंतच्या परिक्षा घ्यायच्या की नाही याचा निर्णय लवकरंच घेण्यात येईल.

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षांबाबत मात्र बोर्डकडून अहवाल मागवण्यात येईल. राज्यात रुग्णांची संख्या वाढत राहिली तर या परिक्षांबाबत देखील निर्णय घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कालच वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला शाळा सुरु कराच्या की नाही, याबाबत महत्वपुर्ण सूचना दिल्या आहेत. याविषयी वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

ट्वीट करत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात काही जिह्यांतील विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार दि.१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना वर्षा गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

तसेच ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या शाळांमध्ये आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय कोरोनाचा आढावा घेण्यात येत आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार परिक्षा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात होणार 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी

जाणून घ्या! गाजर खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

शहनाज गीलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचा मोठा खुलासा; म्हणाला….

कंगना राणैतनं केली श्रीदेवींसोबत स्वतःची तुलना; म्हणाली…