नांदेड | नांदेडच्या बिलोलीमध्ये शिक्षकांनीच विद्यार्थीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बिलोलीमध्ये उघडकीस आली आहे.
भाजप नेते खतगावकर यांच्या संस्थेच्या शाळेत मानवतेला काळीमा फासणारी ही घटना घडलीये. दोन शिक्षकांनी सामूहिकरित्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. तसंच ही घटना लपवण्यासाठी मुख्याध्यापकांनी देखील मदत केल्याचा आरोप होत आहे.
उघडकीस आलेल्या घटनेने पंचक्रोशीत तणावाचं वातावरण आहे. समाजाच्या विविध स्तरातून शिक्षकांचा निषेध केला जातोय. शिक्षक आणि मुख्याध्यापकांना बडतर्फ करण्याची एकमुखी मागणी होत आहे.
दरम्यान, आरोपींवर तातडीने करवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. तसंच शासकिय पैशातून तिच्यावर वैद्यकीय उपचार केले जावेत आणि कुटुंबाला शासनाच्या वतीने कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली जावी अशीही मागणी नातेवाईकांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळेंनींही आपल्या कुटुंबासोबत घेतला ‘तान्हाजी’ चित्रपटाचा आनंद