कोरोनाग्रस्त मातेने आपल्या बाळाला जन्म दिल्यावर घेतला अखेरचा श्वास; बाळाचा अहवाल आला…

नागपूर | नागपूरमधील मेयोतील कोव्हीड रुग्णालयात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 20 वर्षीय महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच आपले प्राण सोडले आहेत. बाळांतनीचा मृत्यू झाला असला, तरी सुदैवाने बाळ सुरक्षित आहे.

बुधवारी 20 वर्षीय गर्भवतीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गर्भवतीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याने रुग्णालयात गर्भवतीवर अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर उपचारही सुरू होते.

गर्भवतीला असाह्य प्रसूतीवेदना येत असल्याने तिला लेबर रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. व्हेंटिलेटरवर ठेवून डॉक्टरांनी तिची डिलिव्हरीही केली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सर्व कुटुंबीय यामुळे आनंदात होते. मात्र, नियतीला हे सुख मान्य नसावं. बाळाला जन्म देताच काही वेळातच बाळांतनीने आपले प्राण सोडले.

दरम्यान, या घटनेने कुटुंबासह रुग्णालयातील नर्स आणि कर्मचारीही हळहळ व्यक्त करत आहेत. नागपूर मध्ये डिलीव्हरीनंतर कोरोना रुग्ण बाळांतणीच्या मृत्यूची ही पहिलीच घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! कोरोना चाचणीच्या नावे तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब!

धक्कादायक! कोरोनामुळे मृत्यु झाल्याने थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच केले सपासप वार

दिलासादायक! 10 ऑगस्ट पर्यंत कोरोनाची लस येणार?

‘या’ भाजप आमदाराच्या भावाच्या मॅरेज हॉलवर चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चांगली बातमी! पुण्यात आज दिवसभरात 2 हजारांहून अधिक रूग्णांची कोरोनापासून सुटका