मुंबई| कोरोना महामारीनं सर्वत्र हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले. अनेकांना आर्थिक, मानसिक संकटांचा सामना करावा लागला. यातच बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं जून 2020 मध्ये राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. नैराश्याच्या गर्देत असलेल्या सुशांतनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडवर टीकास्त्र सोडलं गेलं.
सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र यातच सुशांतची जवळची मैत्रिण क्रिती सेनाॅननं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी क्रितीला चांगलच ट्रोल केलेलं पहायला मिळालं. अशातच आता एवढ्या दिवसांनंतर यावर क्रितीनं खुलासा केला आहे.
2020 बद्दलच्या कटू आठवणी व्यक्त करताना अभिनेत्री क्रिती सेनाॅननं म्हटलं की, ‘त्यावेळी सर्वच ठिकाणी एवढा गोंधळ सुरू होता. सर्वजणच त्यावर काही ना काही बोलत होते. एक वेळ अशीही आली की, या सर्वात मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता दिसू लागली होती. या नकारात्मकतेत मला सहभागी व्हायचं नव्हतं.’
क्रिती पुढे म्हणाली की, त्या वेळी मला काय जाणवत होतं किंवा किती दुःख झालं होतं हे केवळ मलाच माहित होतं आणि मला ते स्वतः पूरतच मर्यादित ठेवायचं होतं. मला काय वाटतंय किंवा काय जाणवत आहे हे मी कोणाला सांगावं असं मला त्यावेळी अजिबात वाटलं नाही. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला सोशल मीडियावर जे बोलायचं ते बोलायला ते तुम्ही बोलू शकता. व्यक्त होऊ शकता.
गेल्यावर्षी मी माझा चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यानंतर काही दिवसांत लॉकडाऊन पडलं. मात्र एक गोष्ट खूपच चांगली झाली. ती म्हणजे माझे आई-वडील मला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानं त्यांना परत जाता नाही आलं. आणि गेली वर्षभर ते माझ्यासोबत राहिले. ते माझ्यासोबत होते म्हणून मला या काळात आधार मिळाला. मला एकटीला ह्या काळात राहणं शक्य नव्हतं. असंही क्रितीनं म्हटलं.
दरम्यान, सुशांतच्या प्रकरणानं संपूर्ण देश हेलावला होता. त्याला न्याय मिळावा म्हणून त्याच्या चाहत्यांनी, कुटुंबानं, मित्र-मैत्रिणीनं खूप प्रयत्न केले.
बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. क्रितीसोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
महत्वाच्या बातम्या –
‘रिप्ड जीन्सची सर्वांनाच चिंता या रिप्ड शर्टचं…
‘विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका’…
‘ही’ झाडं लावा आणि मच्छरांना पळवून लावा, वाचा…