देश

मोदींच्या 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनानंतर आता राहुल गांधींच रोजगारासंदर्भात मोठं आश्वासन

नवी दिल्ली : लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणुका. आणि याच उत्सवात लोकांची मत आपल्याकडे वळवण्यासाठी विविध पक्षनेते आपल्या प्रचारसभांमधून नानाविध आश्वासनं देत असतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान भारतीयांना अनेक आश्वासनं दिली. त्यातीलच एक म्हणजे मोदींनी भारतीय तरुणांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण झालं नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्यांने केला जात आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मोदींच्या या पूर्ण न झालेल्या आश्वासनांवर भाष्य केलं आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

-पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?

नवी दिल्लीमध्ये काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मोदींनी दिलेलं 2 कोटी रोजगार. मोदींनी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

या विषयावर भाष्य करत असताना राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल करत असतानाच काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काय करतील राहुल गांधी काय करतील याबाबत त्यांनी आश्वासन दिली.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर मोदींसारखी खोटी आश्वासने नाही देणार. मोदींनी 2 कोटी रोजगार देण्याचं जाहीर केलं तसं आम्ही नाही करणार पण दरवर्षी 22 लाख तरुणांना रोजगार देणार असल्याचं राहुल गांधींनी आश्वासन दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची चिंता स्पष्टपणे दिसत आहे. देशभरात मोदींच्याविरोधात सुप्त लाट असताना आता निवडणुकीत मोदींचा पराभव नक्की आहे आणि आम्ही सहज जिंकू, असा दावा राहुल गांधींनी केला. 

सर्जिकल स्ट्राईकवरुन सुरु असलेल्या राजकारणाबाबतही राहुल गांधींनी भाष्य केलं आहे. त्यावर ते म्हणाले, आमच्या काळात सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसने केले नाहीत तर भारतीय सैन्याने केले आहेत. 

सध्या मोदी सध्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ची प्रॉपर्टी मानतात. काँग्रेसच्या काळात मोदी जर सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत असतील तर ते भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत.

राहुल गांधींनी दिलेल्या आश्वासनावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IMPIMP