26/11 चा म्होरक्या हाफिज सईदला न्यायालयाचा दणका; मोठी शिक्षा सुनावली

मुंबई | 26 नोव्हेंबर 2008 मुंबईसाठी काळा दिवस ठरला. अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्याचबरोबर अजमल कसाबला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.

मुंबईत दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ट्रेनिंग दिल्याचं सिद्ध झालं होतं. मात्र, पाकिस्तानने कधीही याची कबुली दिली नव्हती. मुंबईत बाॅम्ब हल्ल्यामागे कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा हात असल्याचं समोर आलं होतं.

मात्र, पाकिस्तानने कधीही ही गोष्ट मान्य केली नाही. अशातच आता पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय हालचाली होत असताना आता हाफिज सईदला न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे.

हाफिज सईदला पाकिस्तानमधील न्यायालयाने 31 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला आणखी दोन प्रकरणात शिक्षा सुनावली.

हाफिज सईद हा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जमाद-उद-दवाचा प्रमुख आहे. अनेक देशांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानमधील दोन प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानात सध्या मोठी राजकीय घडामोड घडत आहे. पंतप्रधान इम्रान खानला आता कोणत्याही क्षणी पायउतार व्हावं लागणार आहे. त्याआधी न्यायालयाने दिलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

‘सिल्वर ओक’वरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”

शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!

‘सिल्वर ओक’वर राडा! सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “माझी आई आणि मुलगी घरात…”

ST कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांच्या सिल्वर ओकवर चप्पल फेक