देश

जम्मू काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय

नवी दिल्ली : मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एक-दोन नव्हे तर तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत यासंदर्भात निवेदन केलं आहे.

काय आहेत मोदी सरकारनं घेतलेले तीन मोठे निर्णय?-

पहिला निर्णय- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं कलम 370 हटवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. या निर्णयासह काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपणार आहे. 

दुसरा निर्णय- जम्मू काश्मीरचं विभाजन करण्याचा निर्णय मोदी सरकारनं जाहीर केला आहे. लडाख आणि काश्मीर वेगळं होँणार आहे. 

तिसरा निर्णय- लडाखला स्वतंत्र दर्जा मिळणार असून काश्मीर आणि लडाख आता केंद्रशासित प्रदेश असेल. 

विरोधकांनी राज्यसभेत या निर्णयावर गोंधळ घातला असला तरी काही विरोधी पक्षांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. फटाके फोडून, घोषणाबाजी करत या निर्णयावर स्वागत करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री महोदय, जनतेची कामं केल्याचा दावा करता तरी तुमच्यावर ही वेळ का येते?”

-“चंद्रकांत पाटील साधे आहेत; त्यांना पत्रकारांच्या गुगली कळत नाहीत”

-विधानसभा निवडणूक लढवणार का??? अशोक चव्हाण म्हणतात…

-बीडचं रुप झपाट्यानं बदलणार; जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास

-“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”

IMPIMP