मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं वातावरण पहायला मिळालं होतं.
भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली.
त्यानंतर भाजप नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज प्रवीण दरेकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल 3 तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर बाहेर आल्यावर प्रवीण दरेकरांनी गंभीर आरोप केले आहेत. सभासद म्हणून काय लाभ घेतला? बँकेकडून काय लाभ घेतला?, असे प्रश्न विचारण्यात आल्याचं दरेकरांनी सांगितलं आहे.
तेच तेच प्रश्न उलट सुलट विचारून मला भंडावून सोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. बरेच प्रश्न विचारले मात्र, नियती साफ आहे, त्यांच्यावर अशा गोष्टींचा परिणाम होत नाही, असं दरेकर म्हणाले आहेत.
चार ते पाच वेळा पीआय कॅबिनमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना कोणाचे फोन येत होते कळलं नाही, असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात मी त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे. आवश्यकता वाटल्यास पुन्हा बोलवू, असंही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी टाईमपास टोळी म्हणायचो पण आता…”, आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर बरसले
Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव
मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका
चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर
“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू”