‘या’ जिल्ह्याने महाराष्ट्राची चिंता वाढवली, धक्कादायक माहिती समोर

मुंबई | ओमिक्रॉन व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशात चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे.

नागपूरमध्ये ओमिक्रॉनचे 3 म्युटेशन आढळले आहेत. नागपुरात ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन आढळून आले आहेत. निरी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. यानंतर नागपुरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

यात B.1.1. 529, B1, B2 या तीन म्युटेशनची नोंद झाली आहे. संशोधनाच्या चौथ्या टप्प्यात 89 नमुन्याची जिनोम सिक्वेन्सी करण्यात आली. त्यात 66.2 नमुना ओमायक्रॉनच्या B2 चे नमुने आढळले तर 31.5 टक्के B.1.1.529 चे आणि 2.3 हे B1 चे नमुने आढळले.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार युनायटेड किंग्डममधील आरोग्य अधिकारी BA.2 चा तपास करत आहेत. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश किंवा जाती (स्ट्रेन) आहेत.

यूकेमध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उप-वंशाचा तपास सुरु झाला आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने BA.2 ला तपासाधीन एक व्हेरिएंट म्हणून नियुक्त केलं आहे.

BA.2 स्ट्रेन आतापर्यंत अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत आणि सिंगापूर येथे त्याचे प्रकार आधीच आढळले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे तीन स्ट्रेन किंवा सब लीनिएज आहेत – BA.1, BA.2 आणि BA.3.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…” </a

अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले 

वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणाले,’अरे हा तर दुसरा विराट’ 

“पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज, ते काँग्रेसला संपवल्याशिवाय राहणार नाही”