मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’प्रवेशद्वारावरच्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मातोश्रीजवळच्या एका चहाच्या टपरीवरील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता खुद्द मातोश्रीवरीलच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे.
मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्तासाठी असतात. हे तीन पोलिस मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी कार्यरत होते. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, हे निष्पन्न झालं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तसंच पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे.
दुसरीकडे मुंबईतलं हॉटस्पॉट असलेल्या धारावीमध्ये कोरोना रूग्ण काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. धारावीमध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या 12 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये देखील घबराट पसरली आहे.
दरम्यान, पुण्यातल्या दौंडच्या राज्य राखीव पोलिस दलातील 8 जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी
-“आम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, म्हणून आम्हाला सरकार वाचवता आलं नाही”
-‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट
-“आज गळे काढणारेच त्या वेळी सत्तेत होते, त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिलं”
-सर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल