नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 संदर्भात मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले.
गेल्या सात दशकात जम्मू काश्मीरने मोठी किंमत मोजली आहे. कमल 370 मुळे राज्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. हे कलम असेपर्यंत काश्मीरमधील दहशतवाद संपू शकत नाही, असं अमित शहा म्हणाले आहेत.
जम्मू काश्मीरचं डील पंडित जवाहरलाल नेहरुंनी केलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी नाही. याउलट पटेलांनी जी राज्ये भारतात विलीन केली तेथे असले कलम नव्हते, अशी माहिती अमित शहांनी राज्यसभेत दिली आहे.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबाबत अमित शहांनी सरकारची भूमिका मांडली. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत हे कलम कसं चुकीचं आहे हे स्पष्ट केलं.
काश्मीर हे देशाचे मुकुटमणी आहे. काश्मीर कालही स्वर्ग होते. आजही आहे आणि उद्याही असेल. राजकारणापलिकडे जाऊन निर्णय घेण्याची गरज होती, असंही अमित शहा म्हणाले.
राजकारणापलिकडे जाऊन निर्णय घेण्याची धमक हवी होती. ती धमक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवली आहे, असंही अमित शहा म्हणाले आहेत.
पंडित नेहरु स्वत: म्हणाले होते कलम तात्पुरतं आहे. मग असे तात्पूरते कलम 70 वर्षे कसं काय टिकते?, असा सवालही अमित शहांनी राज्यसभेत उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसला मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्वाच्या नेत्याचा राजीनामा
-अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच सहा शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन
-जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं तर काय होईल???
-ईव्हीएम गेलं तर भाजपही जाणार; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
-“देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार!!!”