36,000 कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरुपी नोकरी; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

चंदीगड | सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंजाब सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुखमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अस्थाई स्वरुपात जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. अस्थाई स्वरुपात काम करणाऱ्या नोकरदारांच्या नोकऱ्या कायम करण्याचा निर्णय चन्नी सरकारनं घेतला आहे.

राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता पंजाबमधील जवळपास 36,000 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. चन्नी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाविषयी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी म्हटलं की, ही एक उत्तम योजना आहे. यामुळे राज्यातील सुमारे 36,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध भागात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिली आहे. त्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार आहे.

निवडणुक तोंडावर असताना सरकारनं घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. निवडणुकीच्या पहिले घेतलेला हा निर्णय काँग्रेसला फायद्याचा ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या निर्णयासोबत सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली आहे. किमान वेतनामध्ये 415.89 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –  

  नोबेल शांतता पुरस्कार पटकवणारी मलाला अडकली लग्नबंधनात; ‘या’ व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ

  लस घेतल्यानं महिलेचं नशीब फळफळलं, ‘अशी’ बनली कोट्यावधींची मालकीण

  ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”