हजारो भारतीयांना आता नोकरीसाठी अमेरिकेची दारं बंद कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला हा निर्णय!

नवी दिल्ली | अमेरिकेत जगभरातील लाखो नागरिक नोकरीसाठी स्थलांतर करत असतात. या देशात नोकरी करण्यासाठी विशेष व्हिसा असावा लागतो. मात्र अमेरिकेने आता या प्रकारचे सर्व व्हिसा रद्द केले आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकेत अस्थायी काम करत असलेल्या लाखो भारतीयांना बसला आहे.

ट्रम्प यांनी एच 1 बी, एच-4 व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने अमेरिकेत नोकरी इच्छिणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे निलंबन वर्षखेरपर्यंत असणार आहे.

कोरोना व्हायरसनं अमेरिकेची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशातच देशातील बेरोजगारीचं प्रमाणही सरकारच्या समोरील चिंतेची बाब ठरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने लाखो नागरिक मायदेशी परतले आहेत. अमेरिकेतील अनेक भारतीयांना यादरम्यान नोकऱ्याही गमवाव्या लागल्या आहेत. ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील हजारो आयटी कर्मचाऱ्यांना याचा तोटा सहन करावा लागू शकतो.

ट्रम्प यांच्या निर्णयाने  कोणत्याही नवीन एच 1 बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करण्यास मनाई असणार आहे. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विश्वासघात केल्यामुळे शिवसेनेविषयी संताप आला; फडणवीसांनी सांगितली ‘ही’ २ कारणं!

-माझ्या नादी लागू नको नाहीतर तो व्हिडीओ… सोनू निगमची फिल्म इंडस्ट्रीतल्या या बड्या आसामीला धमकी

-मुख्यमंत्रिपद गेलं यावर विश्वास बसायला दोन दिवस लागले- देवेंद्र फडणवीस

-नवविवाहितेची आत्महत्या; अंत्यविधीवेळी पतीनं केलेलं कृत्य ऐकून काळजाचा थरकाप उडेल

-“तुमची अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत तर अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय”