आदित्य ठाकरेंना चार वेळा फसवणाऱ्या तरुणाला पोलिसांंनी केली अटक

मुंबई : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. राज्यभरात जनआशिर्वाद यात्रेतून ते राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, दुसरीकडे एका डिलिव्हरी बॉयने तब्बल 4 वेळा फसवल्याचे समोर आले आहे. धीरेन मोरे असं या 19 वर्षीय आरोपी डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. खेरवाडी पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी डिलिव्हरी बॉय धीरेन मोरेने आदित्य ठाकरे यांच्या नावाने स्वतःच वस्तू पार्सलच्या माध्यमातून ‘मातोश्री’वर पोहचवल्या. त्यानंतर मातोश्रीवर जाऊन वस्तू देत मोठी रक्कम वसूल केली.

विशेष म्हणजे सुरुवातीला मातोश्रीवर ना कार्यकर्त्यांना संशय आला ना पोलिसांना. आरोपी डिलिव्हरी बॉयने तब्बल 4 वेळा मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंच्या नावे पैसे वसूल केले.

आरोपी धीरेन कमी किमतीच्या वस्तू पार्सलच्या माध्यमातून मातोश्रीवर पोहोचवायचा. मातोश्रीवर गेल्यावर तेथील कार्यकर्ते किंवा पोलिसांना फसवत मोठी रक्कम करत वसूल करायचा. इतक्या वेळा शिवसेना कार्यकर्ते आणि पोलिसांना गंडवल्याने अनेकांना विशेष वाटले.

4 वेळा यश आल्यानंतर पाचव्यांदाही आरोपी धीरेनने हिंमत केली. मात्र, स्वतः आदित्य ठाकरेंनीच ऑनलाईन वस्तू मागवल्या नसल्याचा खुलासा केल्यानंतर त्याचं बिंग फुटलं. त्यामुळे पाचव्यांदा गंडा घालताना खेरवाडी पोलिसांनी आरोपी धीरेन मोरे याला अटक केली.

महत्वाच्या बातम्या-