महाराष्ट्र मुंबई

‘उगाच बोंबलू नका… एका दिवसाचा खर्च वाचलाय’; बच्चू कडूंना गुलाबराव पाटलांचं उत्तर

मुंबई |  सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे या निर्णयावरून शिवसेना नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. बच्चू कडू यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यांना आता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

सरकारने 5 दिवसांचा आठवडा केला असला तरी त्याचसोबत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत वाढ केली आहे. 45 मिनिटे प्रतिदिन वाढवण्यात आली आहे. कर्मचारी त्यांचे काम करतील. पण बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मुल्यमापन करायचं झालं तर ते करणार कसं? असा प्रतिसवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत मोठी बचत होणार आहे. प्रशासकीय कार्यालयातील एक दिवसाचा खर्च वाचणार आहे त्यामुळे उगाच बोंबाबोंब करू नये. यामध्ये वीज बिल, पाणी बिल, वाहनातील इंधन खर्च असं कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार कशासाठी? सरकारी कर्मचारी 2 दिवसांचं तरी काम करतात का हे अगोदर शासनाने तपासावं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 5 दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी कर्मचारी आनंदित आहेत मात्र दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर सर्वसामान्यांना काही आक्षेप आहे आणि हेच आक्षेप कडू यांनी अधोरेकित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी मांडल्या पोलिसांच्या व्यथा; लिहिलं गृहमंत्र्यांना पत्र

-खुशखबर…. आता तुम्ही कुठेही असाल तरी तुमच्या उमेदवाराला मतदान करू शकता!!

-धक्कादायक… महावितरणकडून शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट!

-कुणी जेलमध्ये टाकायची भिती घातली तर पवारसाहेबांना आठवा- रोहित पवार

-राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी! आमदार म्हणतात…