खेळ

ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडू्ंना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य पूर्वतयारीसाठी देण्याची घोषणा क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी आशिष शेलार यांनी पात्र ठरलेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जााधव या दोनच खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक तिकिट निश्चित करण्यात आले आहेत.

राहीने पिस्टल नेमबाजीमध्ये पात्रता निकष गाठला आहे, तर प्रवीणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे दोनच खेळाडू दिसतील.

दरम्यान, जपानची राजधानी टोकियो या शहरात 24 जुलै 2020 ते 9 ऑगस्ट 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सावत्र वडिलांनी केलेल्या छळानंतर श्वेता तिवारीची मुलगी म्हणते…

-“मी विमान पाठवतो, तुम्ही स्वत: या आणि काश्मीरमधील परिस्थिती बघा”

-बालपणापासूनच्या ते गेल्या 18 वर्षापर्यंत मोदींनी सांगितल्या ‘या’ सगळ्या गोष्टी

-कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

-अमित शहा स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी जाणार?

IMPIMP