राज्यातील जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; जेलमधील 50 टक्के कैद्यांना सोडणार

मुंबई | कोरोना विषाणूने आता राज्यातील कारागृहातही शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्यातील कारागृहातील 50 टक्के कैदी सोडण्याचा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे.

राज्यातील कारागृहातील तब्बल चार हजार कैद्यांना काहीदिवसांपूर्वीच सोडण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात 48 जेल आहेत. या जेलमध्ये एकूण 35 हजार 239 कैदी आहेत. यापैकी 50 टक्के कैद्यांना सोडणार आहेत, असा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे.

देशभरातील जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेतली. ज्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि ज्यांना सात वर्षांची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांना पेरोल, जामीन किंवा तात्पुरता जामीनावर सोडा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्यातील विविध जेलमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आर्थर रोडमधील कोरोनाबाधितांचा आकडा 104 वर पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गुडन्यूज… गेल्या २४ तासात या १० राज्यात कोराना एकही नवा रुग्ण आढळला नाही

-युवक काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

-कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचं शोषण करु नका- राहुल गांधी

-काँग्रेसकडून मला सहाव्या जागेची ऑफर होती, भाजप आमदारही क्रॉस वोटिंग करणार होते- एकनाथ खडसे