“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू”

मुंबई | महापालिका निवडणुकीचे (Municipal Election) वारे सध्या राज्यात वाहत आहे. मुंबई, पुण्यासाठी राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका चालू वर्षात होण्याचीच शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह (Shivsena) राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसनंही (Congress) जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई (Mumbai) महापालिका निवडणूक जिंकू, असा थेट इशारा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दिला आहे.

मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

ही सारी सुंदोपसुंदी देशातील एका राज्याएवढे मोठे बजेट असणाऱ्या मुंबई पालिकेसाठी आहे. आता ही पालिका आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून जिंकू, असा दावा राऊत यांनी केला आहे.

ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढूल आणि जिंकू, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि आता मनसेही आक्रमक झाली आहे. एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून राऊतांपासून अनेक नेत्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा 

जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही… 

“गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली होती पण…”

युक्रेनमधून भयंकर बातमी समोर, युक्रेनच्या मंत्र्याचा अत्यंत धक्कादायक दावा