“शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण…”

पुणे | महाराष्ट्रातील राजकारण पेटलं असून सध्या राजकीय हालचाली पहायला मिळत आहे. त्यातच काल राज ठाकरेंच्या भाषणानं या आगीत आणखीन तेल ओतल्याचं पहायला मिळालं.

काल झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादीला अधिक लक्ष केल्याचं दिसून आलं.

राज ठाकरेंच्या भाषणातील फटकेबाजीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदीचे भोंगे हे परंपरागत आहेत. तेच पुढे सुरू आहे. मशिदीसमोर भोंग्यावर हिंदूंची हनुमान चालीसा लावू नये. ते मंदिरात लावावेत, त्याला हरकत नाही. त्यामुळे मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत नसल्याचं आठवले यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या जातीवादाच्या आरोपांवरही रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत नाहीत, पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जातीपातीचे राजकारण करतात, असं आठवलेंनी सांगितलं.

मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला

पिंपरी चिंवडमध्ये बोलताना रामदास आठवले यांनी राज ठाकरेंविषयी वक्तव्य केलं. राज ठाकरे हे अगोदरपासूनच हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. मात्र, आम्हाला राज ठाकरेंची आवश्यकता नाही.

भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही. कारण त्यांचा अजेंडा वेगळा आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल 

  “शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”