नवी दिल्ली | भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान 3 वनडे आणि 3 टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी बीसीसीआयने 18 जणांची निवड केली आहे.
अशातच आता वेस्ट इंडिजच्या एका फलंदाजाने वादळी शतक ठोकत भारतीय गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. भारताच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडशी दोन हात करत आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात रोव्हमन पॉवेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 20 धावांनी पराभव केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी बाद 224 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला 9 बाद 204 धावा करता आल्या.
पॉवेलने 53 चेंडूत 107 धावांची तुफानी खेळी केली. या पारीमध्ये त्याने 10 गगनचुंबी षटकार देखील खेचले आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने निकोलस पूरनसोबत 70 धावांची जबरदस्त फलंदाजी केली.
पाॅवेलने सुरूवातीपासून आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा घाम फोडला. त्याने मैदानाच्या चारही बाजूचे क्षेत्ररक्षक पळवले. पॉवेलच्या शतकच्या जोरावर 20 षटकात 224 धावा केल्या.
त्याचवेळी पॉवेलने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सिक्सर किंग युवराज सिंग आणि युनिव्हर्सल बाॅस ख्रिस गेलला मागे सोडलं आहे. रोव्हमन पॉवेलला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून घोषित देखील करण्यात आलं आहे.
दरम्यान वेस्ट इंडिजने दिलेल्या 225 धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडला फक्त 204 धावा करता आल्या आणि वेस्ट इंडिजने हा सामना 20 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! आता किराणा दुकांनामध्ये वाईन मिळणार
आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी
टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता
मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”