Top news आरोग्य देश महाराष्ट्र मुंबई

कोरोनापेक्षा खतरनाक आहेत हे 7 आजार; प्रत्येकालाच माहीत हवेत!

Virus

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या प्राणघातक विषाणूमुळे फक्त जीवच गेले नाहीत तर देशाची अर्थव्यवस्था ही ढासळी आहे.  पण आता कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोरोनापासून सुटका झाली असं म्हणता येणार नाही, मात्र यापुढील काळातही काळजी घेणं गरजेचं आहे.

आपल्याला पुढील आयुष्यात अनेक मोठ-मोठ्या संसर्गांना सामोरे जावे लागेल असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.  कोरोनापेक्षा अनेक मोठे साथीचे रोग हल्ला करु शकतात.  यासाठी सर्वांनीच लवकर आणि वेगानं पावलं उचलायला हवीत.

इबोला- आफ्रिकेतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आफ्रिकेतून सध्या इबोलाचा प्रसार होत आहे. तो प्रसार होण्याचा वेग फार नाही, मात्र हा ताप खूपच जीवघेणा आहे.

इबोला हा रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो.  WHOचा दावा आहे की, इबोला देखील एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतो. इबोलाच्या 3400 प्रकरणांपैकी  2270 लोकांचा मृत्यू झाला आहे.  जानेवारी 2020 मध्ये इबोलाची लसदेखील देण्यात आली होती, परंतु ती फारशी प्रभावी नव्हती.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, इबोला रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसून येतील.

लस्सा ताप- लस्सा ताप येणे हे व्हायरल इन्फेक्शन आहे.  ज्यामुळे रक्तस्रावाच्या आजाराची लक्षणे उद्भवतात. लस्सा तापाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मूत्रपिंड व  यकृतावर फार वाईट परिणाम होतो.  हा आजार लघवी किंवा रक्त यांच्या संक्रमणाद्वारे लोकांमध्ये पसरतो.

मार्बर्ग रोग- हा कुटुंबातील एका व्यक्तीला झाला तर विषाणूचा प्रसार करतो. हा रोग अत्यंत संक्रामक आहे. जिवंत किंवा मेलेल्या लोकांच्या संपर्कात आपण आलो तरी देखील तो पसरतो. 2005 साली युगांडामध्ये या साथीचा प्रथम प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यात 90 टक्के संसर्ग झालेल्या लोकांचा मृत्यू झाला होता.

MEIS COV- ‘मिडल ईस्ट रेस्पीरी सिंड्रोम’ देखील एक अतिशय धोकादायक संसर्ग आहे, जो श्वसनाच्या थेंबांद्वारे मानवांमध्ये पसरतो. SARS-COV-2 संबंधित आजार देखील आहे, कारण दोन्ही एकाच प्रकारे पसरले आहेत. 2002 मध्ये चीनमध्ये या आजाराची पहिली घटना नोंदली केली गेली आहे. SARS 26 देशांमध्ये पसरला आणि सुमारे 8,000 लोकांना त्याचा फटका बसला आहे.

निपाह व्हायरस- हा गोवर विषाणूशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2018 मध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणात तो पसरला होता. या आजारावर यशस्वीरित्या नियंत्रण ठेवण्यात आले होते, परंतु त्याची लक्षणे आणि संक्रमित करण्याचे मार्ग, भविष्यात त्याचे प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

डिसीज एक्स- 2021 मध्ये डिसीज एक्स हा साथीचा रोग म्हणून उदयास येईल अशी शक्यता आहे. जीन जॅक मुम्बे म्हणतात, “जग कोरोनाशी झुंज देत आहे आणि त्या दरम्यान एका नवीन विषाणूचा धोका वाढला आहे. रोग-एक्स हे नवीन विषाणूचे नाव आहे. परंतु इतर साथीच्या रोगांपेक्षा ते भयंकर असू शकते.

डीसीज एक्स बद्दल अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक दावा म्हणजे 80-90 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा अत्यंत धक्कादायक दावा असून जर असं घडलंच तर हा खरोखर कोरोनापेक्षा खतरनाक आजार ठरु शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय तब्बल 65 हजारांपर्यंत सू.ट; वाचा सविस्तर

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! आरबीआयनं जाहीर केलीय ‘ही’ खास ऑफर

नागपूरमधील त्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ती तरुणी त्याची प्रेयसी नव्हती?

कारला लागतेय अचानक आग; या कंपनीनं आपल्या 4 लाख 71 हजार गाड्या परत मागवल्या!

बंद गाडीत मास्क वापरणं गरजेचं आहे का?; मोठा निर्णय अखेर जाहीर