Top news मनोरंजन

साऊथचे 7 जबरदस्त हिट हिंदी सिनेमे; हे पाहिले नाहीत तर काय पाहिलं?

सध्या कोरोना महामा,रीनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाकाळात लोक घरीच असल्यानं दिवसातले कित्येक तास मोबाईलवर टाईमपास करण्यात, चित्रपट पाहण्यात किंवा मन रमेल अशा गोष्टीत घालवत आहेत. आपल्यापैकी बरच लोक साऊथच्या चित्रपटांचे चाहते असतात. साऊथचे बरेच हिट चित्रपट हिंदीमध्ये भाषांतरित झाले आहेत. इंटरनेटवर तुमच्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या अशाच काही चित्रपटांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

1. केजीएफ (2018)
केजीएफ हा साऊथचा अतिशय गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. केजीएफ चित्रपटात रॉकी नावाचं एक कॅरॅक्टर आहे. या रॉकीची आई त्याला म.रण्यापूर्वी म्हणते, तू आयुष्यात तुला हवं तसं जग पण या जगातील खूप श्रीमंत माणूस बन.

या चित्रपटात ड्रामा, इमोशन, म्युजिक, इत्यादी सर्व गोष्टी भरभरून आहेत. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. तर चित्रपटातील रॉकीची मुख्य भूमिका अभिनेता यश याने केली आहे.

2. विश्वरूपम (2013)
विश्वरूपम हा चित्रपट जासुसीवर आधारित आहे. जासुसीवर आधारित असणाऱ्या याही चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. या चित्रपटात पूजा नावाची स्त्री तिच्या नवऱ्याच्या विचित्र वागणुकीमुळे त्याच्या पाठलागावर एक गुप्तहेर ठेवते. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता कमल हसन हे आहेत.

3. मरयन (2013)
मरयनचा अर्थ केव्हाही म.रण न पावणारा असा होता. पिक्चरच्या कहाणीची सुरुवात मरयनपासूनच होते, जो की एक मासे पकडणारा असतो. गावतल्या एका मुलीला मरयनवर प्रेम होतं. मात्र, मरयन नेहमी त्याच्याच नादात असतो. पुढे जावून त्याचाही त्या मुलीवर जीव जडतो आणि चित्रपटात एक वेगळा तडका सुरु होतो. भारत बाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

4. डीअर कॉम्रेड (2019)
या चित्रपटात आपल्याला बॉबी आणि लिली या दोघांची प्रेम कहाणी पाहायला मिळते. लिली क्रिकेटची दिवाणी असते आणि तिला देशासाठी खेळायचं असते. बॉबी लिलीवर प्रचंड प्रेम करत असतो. मात्र, बॉबीच्याच रागामुळे हे दोघेजण पुढे जावून एकमेकांपासून वेगळे होतात. पुढे जावून कित्येक वर्षांनी या दोघांची पुन्हा भेट होते. भारत कैमा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

5. दशावतारम (2008)
या चित्रपटात अभिनेता कमल हसन याने खूप उत्तम काम केलं आहे. या चित्रपटाची कहाणी 12व्या शतकापासून सुरु होते आणि 21व्या शतकापर्यंत येवून थांबते. एस रविकुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

6. घातक रात (2018)
कर्नाटकच्या छोट्याश्या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातून या चित्रपटाची सुरुवात होते. हे कुटुंब खूप काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरत असतं. एकदिवस या कुटुंबाला एक भविष्य सांगणारा भेटतो आणि तो यांना म्हणतो की, तुम्हाला खूप पैसा मिळणार आहे फक्त तुम्हाला त्याचा योग्य वापर करायचा आहे. या चित्रपटाचा शेवट खूप जबरदस्त आहे.

7. ‘शिवाजी: द बॉस’ (2007)
या चित्रपटात शिवाजी नावाच्या व्यक्तीची भूमिका रजनीकांतने केली आहे. या पिक्चरची संपूर्ण कहाणी शिवाजीशी जोडलेली आहे. शिवाजी हा परदेशातून परतून सामाजिक कार्य करत असतो. काम करताना त्याला अनेक अडचणी येतात. मात्र, शेवट त्याचाच विजय होतो.

महत्त्वाच्या बातम्या-

रियानं सुशांतला आ त्मह.त्या करण्यास प्रवृत्त केलं होतं? सीबीआयचा मोठा खुलासा

कोरोनामुळे नपुंसकत्व येवू शकतं; संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे होते टार्गेटवर, स्टडी रिपोर्टचा धक्कादायक खुलासा!

सुशांत सिंह राजपूतनं आ त्मह.त्याच केली हे कशावरून? एम्सच्या टीमनं दिलं स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार