‘भाजपमधील 70 टक्के आमदार आमचेच, कोणाला परत घ्यायचं ते…’; छगन भुजबळांचं मोठ वक्तव्य!

मुंबई | अलीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकेमकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. दोन्ही बाजूचे नेते सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीला राज्यातील राजकारणात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019 नंतर भाजपच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप मधील अनेक नेते येत्या काळात राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी दिले आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदारांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप मधील अनेक आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मधील 70 टक्के आमदार आमचेच आहेत. आजी माजी आमदार महाविकास आघाडीत येण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला थांबवायचे? हे शरद पवार ठरवतील, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

दरम्यान, येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. मुंबईत एका वृत्त माध्यमाशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले होते की, गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहेत. भाजपचे हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा अधिक सदस्य नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे.

याबद्दल लवकरंच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत येत्या काळात लवकरंच मेगा भरती होण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकरणात एकंच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी आंदोलनावर कंगना पुन्हा बरळली! अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हणाली…

लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत नेहा म्हणाली…

सुशांत प्रकरणी करण जोहरचं नाव समोर येताच कॉंग्रेस नेत्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल!

5 आणि 10 रुपयांची ही नाणी विकून तुम्हीही कमवू शकता लाखो रुपये, वाचा सविस्तर

तुमच्यात ‘ही’ 5 लक्षणे दिसत असतील तर तुम्हालाही कोरोना होऊन गेलाय, असं समजा