पुणे महाराष्ट्र

सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

सोलापूर | आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जर आघाडीची सत्ता आली तर भूमिपूत्रांना नोकरीत 75% आरक्षण देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलं आहे.

विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून लढायला इच्छुक असणाऱ्यांच्या अजित पवार मुलाखती घेत आहेत. ते आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश सरकारने स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील असा कायदा करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 175 जागा जिंकणार, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे.

अजित पवार सोलापूरात मुलाखत घेण्यासाठी पोहचले मात्र सोलापूरातील मुलाखतीला पक्षाचे 2 विद्यमान आमदार गैरहजर होते. माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल या दोन विद्यमान आमदारांनी मुलाखतीसाठी अजित पवारांकडे जाण्याचं टाळलं असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी विद्यमान सरकारवर गंभीर आरोप केले. सरकार आज अनेक संस्थांचा वापर करत विरोधकांना घाबरवण्याचं काम करत आहे, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

-“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

-30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

-मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

IMPIMP