नवी दिल्ली | हिमाचल प्रदेश सरकारने नुकतीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली होती. सरकारच्या या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळत असल्याचं पहायला मिळतंय.
अशातच आता लवकरच मोदी सरकार महागाई भत्ता जाहीर करण्याची शक्यता आहे. 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा भरणा देखील सरकार लवकरच एकरकमी भरणार असल्याची आशा देखील कर्मचाऱ्यांना आहे.
लाखो कर्मचारी सरकारच्या या घोषणेची वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीसह 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही देणार असल्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पाआधी याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याबाबत सरकार सध्या सकारात्मक विचार करत आहे. असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत 18 महिन्यांच्या थकबाकी डीए देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो.
जुलै आणि जानेवारी महिन्यात सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतं असतं. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद केला होता.
18 महिन्यांची थकवलेली डीएची थकबाकी भरलेली नाही, ज्याची केंद्रीय कर्मचारी वाट पाहत आहेत. हिमाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, हरियाणा, आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ताची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कडाक्याच्या थंडीमुळे उद्भवतात समस्या; अशी लक्षणं दिसताच घ्या डाॅक्टरांचा सल्ला
Omicron किती वेळ जिवंत राहू शकतो?, अभ्यासातून सर्वात मोठा खुलासा झाला
सचिन तेंडूलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आता उशीर झालाय पण, रोहित-राहुलची जोडी…”
मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं…
आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी