7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर; अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्र सरकार सातत्यानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक आकर्षक योजना (7th Pay Commission) घेऊन येतं. कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारनं आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाने एक घोषणा केली आहे. देशातील सुमारे 47 लाख 68 हजार केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार पेन्शनधारकांना या घोषणेचा फायदा मिळणार आहे.

केंद्र सरकारने डीए मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2022 पासून याचा फायदा घेता येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. त्याचबरोबर आता थकबाकी देखील मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरून 34 टक्के करण्याची घोषणा करण्यात आली. यासोबतचं पेन्शनधारकांच्या डीआरमध्येही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, आता मोदी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यास मान्यता दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले

भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

“जसा उंच असतो ढोंगा, बरा नाही तो भोंगा”