भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. जगभरातील संशोधक या व्हायरसवर लस शोधण्याचं काम कसोशीने करत आहेत. भारतातही कोरोना (कोव्हिड-19) पाॅझिटीव्ह रूग्णांचा आकडा 3 लाखाच्या घरात जाऊन पोहचलाय. लस उपलब्ध नसताना या बाधितांवर उपचार कसे होत असतील अशी शंका आपणास येऊ शकते. डाॅक्टरांकडून यासाठी काही विशिष्ट औषधांची निवड केली जात आहे. या औषधांचा सविस्तर आढावा सदर लेखातून घेऊया-

रेमडेसीवर

कोरोना: भारत में इन 8 दवाओं से ठीक हुए ज्यादातर मरीज

रेमडेसीवर हे औषध उत्तम प्रकारचं विषाणूरोधी ( अँटीव्हायरल) औषध मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या चाचणीत हे कोव्हिड-19 विषाणूच्या विरोधातील प्रभावी औषध ठरलं आहे. 2014 साली आफ्रिकेत पसरलेल्या इबोला व्हायरसच्या काळात या औषधाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता.

corona 3

अमेरिकेतील ‘नॅशनल इन्सिट्युट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीज’ या संस्थेच्या पडताळणीतही या औषधाचा वापर केल्यास कोरोना रूग्ण हा 15 दिवसांच्या आत बरा होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. भारतात 1 जून पासून या औषधांचा वापर करण्याचे ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने निर्देश दिले आहेत.

फेविपीरवीर

corona 4

फेविपीरवीर हे सुद्धा विषाणूविरोधी औषध म्हणून ओळखलं जातं. शितज्वराच्या आजारात या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जपानच्या फ्युजीफिल्म टोयामा केमिकल लिमिटेड या कंपनीने हे औषध सर्वप्रथम विकसीत केलं होतं.

corona 5

भारतात या औषधाच्या उत्पादनाची मान्यता ‘ग्लॅनमार्क फार्मास्युटिकल्स व स्ट्राइड फार्म’ कंपनीला देण्यात आली आहे. कोरोनाची सौम्य व गंभीर अशा दोन्ही प्रकारची लक्षणं आढळून येणाऱ्या रूग्णांना हे औषध सध्या दिलं जातंय. फेविपिरवीरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील तपासणी अद्याप बाकी आहे.

टोसिलीजुमाब

tocilijumab 2

सरकारी दवाखान्यात टोसिलीजुमाब या नावाच्या गोळ्या मोफत वाटण्यात येतात. संधिवाताच्या त्रासात या गोळ्यांचा वापर केला जातो. आता मात्र कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी या औषधाचा वापर करण्यात येतोय. मुंबईत जवळपास 100 हून अधिक कोरोना बाधीत रूग्णांना हे औषध देण्यात आलं आहे.

tocilijumab 4

या गोळ्यांच्या प्रभावाने अनेक कोरोना रूग्णांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. मात्र डाॅक्टरांकडून यासंबंधी आकडेवारी अद्याप जाहीर करणं योग्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतात अन्य ठिकाणीही या गोळ्यांची चाचपणी अद्याप सुरू आहे. Roche Pharma या कंपनीकडून या औषधाचं उत्पादन करण्यात येतं.

इटोलीजुमैब

itolijumeb 2

 

सोरायसिस, संधिवात व स्वयंप्रतिरोधक प्रकारच्या आजारात या औषधाचा वापर सहसा केला जातो. भारतातील बायोकाॅन कंपनीकडून 2013 मध्ये या औषधांची विक्री करण्यात आली. दिल्ली व मुंबईसह अनेक शहरात सध्या सौम्य व गंभीर कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रूग्णांवर या औषधांची चाचणी केली जातेय. जुलै दरम्यान या चाचणीचे निष्कर्ष समोर येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

हायड्रोक्सीक्लोरोक्विन

corona 9

हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे नाव एव्हाना सर्व भारतीयांच्या परिचयाचं झालं असावं. अमेरिका व जगभरातील अन्य देशांत भारताच्या या औषधाची मागणी आहे. मलेरियाच्या आजारावरील हे औषध कोरोना विषाणूवरही प्रभावी असल्याचं सर्वत्र चर्चेत आहे. मात्र ‘द लेसेंट’ या मासिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून या औषधाची पडताळणी थांबविण्यात आली होती.

hydroxycloroquine 1

मात्र पुन्हा एकदा या औषधाची पडताळणी सुरू करण्यात आलीय. ताप, डोकेदुखी, अंगदुखी इ. सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून आल्यास या औषधाचा रूग्णांवर वापर केला जात आहे. मात्र या औषधाचे साईड इफेक्ट पाहता आता काही रूग्णांवरच याचा वापर केला जातोय.

डाॅक्सिसायक्लिन+आईवरमेक्टिन

डाॅक्सिसायक्लिन या औषधाचा श्वसन तंत्रातील किंवा मुत्रमार्गाच्या भागातील संसर्ग झाल्यास सामान्यतः वापर केला जातो, तर आईवरमेक्टिन शरिरातील जंत मारण्यासाठी सध्या वापरात आहे. एवढंच नाही तर उंदरांना मारण्यासाठी देखील या औषधाचा वापर केला जातो.

doxycycloquine 1

या दोन वेगवेगळ्या औषधांचं मिश्रण करून सध्या कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार केला जात आहे. बांगलादेश वैद्यकिय महाविद्यालयाच्या संशोधनानुसार या औषधाच्या वापराने  60 टक्के कोरोना बाधीत रूग्ण बरे झाल्याचा दावाही करण्यात आलाय.

रिटोनावीर + लोपीनाविर

rotonavir

एचआयव्ही बाधीत रूग्णांवर या औषधाचा वापर विषाणूविरोधी म्हणून केला जातो. या औषधाची चाचपणी अद्याप सुरू आहे. मात्र काही संशोधनाअंती या औषधाचा वापर केल्यास मृत्यूदर नियंत्रणात येत असल्याचा दावा केला गेला आहे.

ritonavir

तर काही संशोधनातून या औषधाचा कोरोना बाधीत रूग्णांवर कसलाच प्रभाव पडत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून आल्यास डाॅक्टर या दोन्ही औषधांच्या मिश्रणाचा रूग्णांवर वापर करतात. भारतातील बहुतांश मेडिकल संबंधी कंपन्या या औषधाचं उत्पादन करत असतात.

प्लाज्मा थेरपी

plazma therapy 1

या थेरपीमध्ये कोरोनातून सुखरूप बाहेर पडलेल्या रूग्णांच्या शरीरातील प्लाज्मा घेऊन बाधीत रूग्णांच्या शरीरात हा प्लाज्मा टाकला जातो. या प्रक्रियेमुळे बाधीत रूग्णांच्या शरिरात कोरोना विषाणूला लढा देणारी रोगप्रतिकारशक्ती तयार होते. दिल्लीतील अनेक हाॅस्पिटलमध्ये सध्या या थेरपीची चाचणी सध्या सुरू आहे.

plasma 4

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (ICMR) नियमावलीनुसार प्लाज्मा थेरपी देणाऱ्या रूग्णांची निवड केली जाते. गंभीर निमोनियाच्या आजारामुळे श्वास घेण्यास अडथळा येणाऱ्या रूग्णांना प्लाज्मा थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो. सध्या कोरोना बाधीत रूग्णांवर प्लाज्मा थेरपीचा वापर केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचा ‘तो’ दावा विनोद तावडेंनी खोडून काढला, म्हणाले…

-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणाले…

-“देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार”

-नाभिक आणि धोबी व्यावसायिकांसाठी नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी

-‘धड खोटंही बोलता येत नाही’; व्हीडिओ पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याची अमित शहांवर टीका