भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 80% आरक्षणाची राज्यपालांची अभिभाषणात ग्वाही

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहात मराठीत अभिभाषण दिले. भुमिपुञांना खासगी क्षेञात नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कायदा करेल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन त्यांना सरकार लवकरच चिंतामुक्त करेल. तसेच, राज्यसरकार शासनातील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु करेल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.

महिलांना समान संधी तसेच त्यांच्या सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य देण्यास सरकार कटिबध्द आहे. त्याचबरोबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्याचा सरकार प्रयत्नयशील आहे, असंही राज्यपालांनी सांगितलं.

राज्यपालांनी अभिभाषणात आणखी काही ठळक मुद्यांचा उल्लेख केला आहे. त्यात, 10 रूपयांत जेवणाच्या थाळीची योजना, तालुकास्तरावर ‘1 रूपयांत क्लिनिक’ योजना, मुंबईत मराठीत भाषा भवन मुख्य केंद्र उभारणी तसेच, सुक्षिशीत बेरोजगारांना छाञवृत्ती यांसारख्या अनेक आगामी योजनांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या-