पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे | कोरोनामुळे देशासह राज्यात अनेकांचे मृत्यू झाले आहे. पुणे जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. पुण्यात जिल्ह्यात आतापर्यंत 61 ते 90 वयोगटातील 80 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.

पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा 61 ते 70 या वयोगटातील रुग्णांना बसला आहे. या वयोगटातील तब्बल 52 रुणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 51 ते 60 वयोगटातील 39 रुग्णांचा, 71 ते 80 वयोगटातील 23 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

41 ते 50 वयोगटातील 22 रुग्णांचा, 31 ते 40 वयोगटात 11 रुग्णांचा, 21 ते 30 वयोगटात 2 रुग्णांचा, 11 ते 20 आणि 10 ते 0 वयोगटात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.

मृतांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. 156 पैकी 65 कोरोनाबाधित महिला मयत असून हे प्रमाण 42 टक्के आहे. तर 91 कोरोना बाधित पुरुष मयत असून हे प्रमाण 58 टक्के आहे. पुण्यात आतापर्तंय 3105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ निर्णय

-लॉकडाउनमध्ये ‘या’ भाजप आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…

-‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

-भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी