लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

मुंबई | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने देशात थैमान घालायला सुरूवात केली आहे. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

राज्यातील एकुण ओमिक्रॉनबाधित रूग्णांपैकी बहुतांश रूग्ण हे मुंबईत आढळून आले. एकीकडे मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झपाट्याने होत आहे, त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे सर्वच स्तरांवरून भीती व्यक्त केली जात आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत कमी घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, जर एखाद्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल तर ओमिक्रॉन व्हेरिएंट त्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतो.

मुंबईतून समोर येत असलेली आकडेवारी ही गोष्ट सिद्ध करणारी आहे. मुंबईत ज्या कोरोना रूग्णांना ऑक्सिजनवर ठेवणं आवश्यक आहे, अशा बहुतेक रूग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.

ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या 1900 कोरोना रूग्णांपैकी 96 टक्के रूग्ण असे आहेत ज्यांनी लस घेतली नाही. फक्त 4 टक्के रूग्णांनीच लस घेतली असल्याची माहिती, मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

रूग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये लस घेतलेल्या व लस न घेतलेल्या अशा दोन्ही रूग्णांचा समावेश आहे. मात्र, ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या बहुतेक रूग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.

लस न घेतलेले जे कोरोनाबाधित रूग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत त्यांचं वय 40 ते 50 वर्षे किंवा त्याहूनही अधिक आहे. त्यामुळे लसीकरण प्रत्येक नागरिकासाठी किती आवश्यक आहे हे यातून स्पष्ट होतं, अशी माहिती बॉम्बे रूग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असती तरी राज्यात शुक्रवारी एकाही ओमिक्रॉनबाधित रूग्णाची नोंद झालेली नाही. कोरोनाचा वाढता धोका बघता लस न घेतलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी

“शाकाहारामुळे माझी सेक्सची इच्छा वाढली, सेक्स हार्मोनची पातळी…”

“56 इंचाची छाती आहे, तर मग घाबरायची काय गरज? पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा…”