Top news मनोरंजन

हेअरकट आवडला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलानं लावला पोलिसांना फोन अन्…..

Photo Credit - Pixabay

नवी दिल्ली| सोशल मीडियावर नेहमी काही न काही व्हायरल होत असतं. कधी कधी व्हायरल झालेल्या गोष्टींनी चकित व्हायला होतं तर कधी हसूहसून लोटपोट व्हायला होतं.

अशातच सध्या एक किस्सा चांगलाच व्हायरल होत आहे. हेअरकट आवडला नाही म्हणून त्या मुलाने चक्क पोलिसांना बोलावलं असल्याची घटना समोर येत आहे.

चीनमध्ये ही घटना घडली. एका 10 वर्षांच्या मुलानं त्याची नवी हेअरस्टाईल आवडली नाही म्हणून चक्क पोलिसांना बोलावल्याचे प्रकरण स्थानिक माध्यमे आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. ही घटना चीनच्या नैऋत्य भागातील अंशुन शहरात घडली आहे.

सलूनवाल्याने त्याचे केस कापल्यानंतर काही काळ हा मुलगा आपली नवी केशरचना काळजीपूर्वक आरशात पाहात राहिला. त्यानंतर तो निराश होऊ लागला आणि त्याच्या निराशेचे रूपांतर हळूहळू रागात होऊ लागलं.

काही क्षणांनंतर त्याच्या चेहऱ्यावरच्या रागाची जागा भावनिकतेने घेतली आणि त्यानं जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

केसांवरून हात फिरवत आणि गोंधळ घालतच त्याने पोलिसांना फोन केला. पोलिस तिथे पोहचल्यावर त्यांनी नेमकं काय घडलं आहे याची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या मोठ्या बहिणीला सांगितलं की, तिने मुलाला फोन करण्यापासून थांबवायला हवं होतं.

मुलाच्या बहिणीनं यावर म्हटलं की, मी त्याला समजावून सांगेल. अशा छोट्या छोट्या प्रकरणांमध्ये पोलिसांना बोलवून त्यांचा वेळ वाया घालवू नये, असेही सांगेन.

या घटनेमुळे पोलिसांना विनाकारण शुल्लक गोष्टीसाठी त्रास झाला. मात्र सोशल मीडियावर या लहानश्या मुलाविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. या रागाच्या भरात लोक अनेक भन्नाट कारनामे करतात.

महत्वाच्या बातम्या – 

नागीन डान्स करुन कोरोनावर करत होता उपचार; पोलिसांनी अशा…

देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा! 10 दिवसांत चिमुकलीनं केली…

कौतुकास्पद! चिमुकल्यानं सायकलसाठी जमवलेले खाऊचे पैसे दिले…

धक्कादायक! कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी आपल्या नवजात…

चक्क कोंबडाही बोलतोय अल्लाह अल्लाह; पाहा व्हायरल होणारा…