ऐकावं ते नवलंच! अवघ्या 23 वर्षांची महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांचं आहे स्वप्न

जॉर्जिया | आपल्यालाही एक मुल असावं, असं प्रत्येक दामपत्याचं स्वप्न असतं. असं म्हटलं जातं की आई होण्याचा आनंदच काही वेगळा असतो. म्हणूनच की काय भारतीय संस्कृतीमध्ये विवाहीत महीलांना अष्टपुत्र साैभाग्यवती भव:चा आशिर्वाद देखील दिला जातो.

पूर्वी महिलांना खूप मुले असायची. इतिहासात देखील याची भरपूर उदाहरणे आहेत. महाभारतातील गांधारीला तर 100 मुले असल्याचे दाखले आहेत. परंतु आता ते शक्य नाही. आता प्रत्येक दामपत्याला एक किंवा दोनच मुले हवी असतात. मात्र, तुम्हाला हे ऐकून नवल वाटेल की रशियातील एका दामपत्याचं तब्बल 105 मुलांचं स्वप्न आहे.

रशियातील क्रिस्टीना ओज्टर्क या महिलेला लहाण मुले प्रचंड आवडतात. तिचे लहान मुलांवर खूप प्रेम आहे. क्रिस्टीना ओज्टर्क सध्या केवळ 23 वर्षांची आहे. परंतु सध्या ती 11 मुलांची आई आहे. 11 मुलांची आई होवून देखील क्रिस्टीना खूष नाही तीचं तब्बल 105 मुलांचं स्वप्न आहे.

क्रिस्टीनाच्या पतीचं नाव गॉलिप ओज्टर्क असं आहे. गॉलिप ओज्टर्क जॉर्जियातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायीक आहे. जॉर्जियातील बातुमी शहरात हे दामपत्य राहतं. या दामपत्याने सोशल मिडीयावर स्वत: 105 मुलं हवी असल्याची ईच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर त्यांची ही पोस्ट भरपूर व्हायरल झाली होती. क्रिस्टीना ओज्टर्कची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक वृत्त माध्यमांनी तिची मुलाखत घेतली. त्यावेळी तिने ही 11ही मुले तिचीच असल्याचं सांगितलं.

क्रिस्टीना म्हणाली की, मी सहा वर्षापूर्वी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर मी यातील एकाही मुलाला जन्म दिला नाही. मात्र, ही सर्व मुले आमच्याच जेनेटीक्सची आहेत. आम्ही सरोगसीच्या माध्यमातून या मुलांना जन्म दिला आहे. आम्हाला अशा अनेक मुलांना जन्म द्यायचा आहे.

आम्हाला किती मुले हवी आहेत हे मी स्पष्ट सांगू शकत नाही. परंतु हे मात्र नक्की आहे की आम्ही 11 मुलांवर थांबणार नाही. आमचं शेवटचं मुल कितवं असेल हे मला माहीत नाही. आम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्याचवेळी त्याचा विचार व्हायला हवा.

तसेच सरोगसीसाठी आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जातो तेच हॉस्पिटल आम्हाला सरोगेट महिला निवडून देतं. त्या महीलेच्या आम्ही वैैयक्तिकरित्या संपर्कात नसतो, असंही क्रिस्टीनानं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बाबो! चालू सामन्यात रोहितने लगावली पंतच्या श्रीमुखात, पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणतात…

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!